साई संस्थान संरक्षण विभागाची सजगता...२ साईभक्तांचे चोरी गेलेली रक्कम मिळवून दिली परत... चोरी करणाऱ्या दाम्पत्यालाही पकडले..!!

साई संस्थान संरक्षण विभागाची सजगता...२ साईभक्तांचे चोरी गेलेली रक्कम मिळवून दिली परत... चोरी करणाऱ्या दाम्पत्यालाही पकडले..!!

S9 NEWS / शिर्डी
साई बाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आलेल्या साईभक्तांचे पैसे चोरी झाल्याची तक्रार येताच संरक्षण विभागातील पोलीस उप निरीक्षक रोहिदास माळी यांच्या मार्गदर्शनाखालील सिव्हील पथकाने चोरी करणाऱ्या एका महिलेला व तिच्या पतीला पकडून चोरी गेलेली रक्कम साईभक्तांना सुपूर्द केली आहे.   
 एका भक्ताचे पाच हजार तर अन्य एका भक्ताचे 25000/- रु असे एकूण 30,000/- रु चोरी गेले होते. तशी संरक्षण ऑफिस येथे तक्रार प्राप्त झाली होती. त्यानंतर  सिविल टीम चे सुरक्षा रक्षक विकास बोधक,साईप्रसाद वाकचौरे,नाना सोनवणे,बाळासाहेब थोरात व श्रीमती शेजवळ यांनी चोरी करणाऱ्या महिलेचा व तिचे पतीचा शोध घेऊन चोरी केलेले पैसे परत मिळवून भक्तांना परत दिले आहेत. त्यावेळी भक्तांना मोठा आनंद झाला असून त्यांनी समाधानही व्यक्त केले. तसेच त्यांनी परत मिळालेल्या पैशांपैकी काही रक्कम दानपेटीत देखील टाकली.
यामुळे सुरक्षा विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या कामगिरीचं कौतुक होत असून नव्याने कार्यभार घेतलेले पोलिस उपनिरीक्षक रोहिदास माळी यांचे अभिनंदन केले जात आहे.
येत्या काळात अशाच प्रकारे साईभक्तांच्या तर्क्रारींचं वेळेत निराकरण झाल्यास शिर्डीचे व साई संस्थानचे नाव देशभर सकारात्मक जाण्यास मदत होईल असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे.