साई संस्थान संरक्षण विभागाच्या चोख नियोजनामुळे रामनवमी उत्सवात "चोरांच्या मनसुब्यांवर पाणी"...सिव्हील पथकाने धरपकड केल्याने अनेक चोऱ्या टळल्या...!!

साई संस्थान संरक्षण विभागाच्या चोख नियोजनामुळे रामनवमी उत्सवात

S9 NEWS / साई सुराळे / शिर्डी


दरवर्षी श्री रामनवमी उत्सवाला शिर्डी मध्ये साईभक्तांची प्रचंड गर्दी होत असते आणि याच गर्दीचा फायदा घेऊन राज्यातील तसेच परराज्यातील चोर, खिसेकापू, सोन साखळी चोर हे मोठ्या प्रमाणात भक्तांच्या चोऱ्या करत असतात. यावर्षी हि रामनवमी च्या अनुषंगाने चोरी रोखने हे श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, संरक्षण विभागापुढे मोठे आव्हान होते.
या अनुषंगाने साई संस्थान मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या सूचना व मार्गदर्शनानुसार झिरो एरर या धर्तीवर नियोजन करून संरक्षण विभाग प्रमुख रोहिदास माळी यांनी चोख नियोजन करून  सकाळी 06-00 ते रात्री 10-00 वाजेपावेतो मंदिर परिसरात सिविल सुरक्षा रक्षक नेमले. त्यानुसार रामनवमी रथाची मिरवणूक चालू होताच सिविल पथकातील सुरक्षा रक्षकांनी संशयित इसम यांची धरपकड चालू केली आणि त्याचे फलित कधीही नव्हे असे घडले कि उत्सवाच्या काळात शिर्डी व मंदिरपरिसरात एकही चोरी झाली नाही.
संशयित चोर यांना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करणेकरीता शिर्डी पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे. उत्सव अतिशय सुनियोजित पद्धतीने कुठलाही अनुचित प्रकार न घडता पार पडला याकामी शिर्डी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने, शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, पोलीस विभागाचे पीआरओ सपोनि महेश येसेकर यांचे मोलाचे योगदान लाभले.
शिर्डी ग्रामस्थांनी कारवाईमुळे समाधान व्यक्त केलं असून साई संस्थान प्रशासनासह संरक्षण विभाग प्रमुख पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी व त्यांच्या टीमचे अभिनंदन व कौतुक केले आहे.
भविष्यातही याच धर्तीवर नियोजन करून कायमस्वरूपी साईभक्तांना त्रासापासून मुक्ती मिळावी व शिर्डीचे नाव बदनाम करणाऱ्या चोर व पाकिटमारांचा कायमचा बंदोबस्त व्हावा अशी अपेक्षा.