साई भक्ताचे हरविलेले पाकीट आणि सोने संस्थान सुरक्षा कर्मचाऱ्यांने केले प्रामाणिकपणे परत...!

साई भक्ताचे हरविलेले पाकीट आणि सोने संस्थान सुरक्षा कर्मचाऱ्यांने केले प्रामाणिकपणे परत...!

S9 NEWS / शिर्डी


श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी च्या संरक्षण विभागातील कर्मचाऱ्याने आपल्या प्रामाणिकपणा आणि इमानदारीचा दाखविलेलाआणखी एक प्रत्यय आज आलाय.


साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या वेल्लोर येथील साई भक्ताचे पैशांचे पाकीट आणि सोन्याचा दागिना हरवला असताना तो सापडलेल्या कर्मचाऱ्याने संरक्षण विभागात प्रामाणिकपणे तो जमा करून संबंधित साहित्यचा शोध घेऊन त्यांना पुन्हा देण्यात आला आहे.


याबाबत सविस्तर माहिती अशी की,दि. 02/04/2024 रोजी वेल्लोर येथील श्री.विजयकुमार या साई भक्तांचे चार नंबर गेट समोर पैशांचे पाकीट व सात ग्राम वजनाचे सोन्याचे झुबे ( 49,000/-रु किंमत ) हरविले होते. सदर चे पाकीट मधील एक हजार रु रोख रक्कम व सात ग्राम वजनाचे सोन्याचे झुबे असा सुमारे 50,000/- किमातीचा मुद्देमाल श्री साईबाबा संस्थान चे सुरक्षा रक्षक सुदाम तुकाराम भानगुडे यांना सापडले आसता त्यांनी ते प्रामाणिकपणे संरक्षण ऑफीस ला येऊन जमा केले. सदर साई भक्तांना ओळख पटवून देऊन त्यांना ते देण्यात आले. यावेळी साई भक्तांनी ही समाधान व्यक्त करत साई संस्थान संरक्षण विभागाचे आभार मानले आहे .


त्यांच्या या चांगल्या कामाबद्दल श्री साईबाबा संस्थान चे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवले यांनी शाबासकी दिली आहे तर सदर प्रामाणिक कर्मचारी भानगुडे यांचा संरक्षण विभागाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी यांनी यथोचीत सन्मान केला.