भक्तनिवासात विसरलेली साईभक्ताची सोन्याची बांगडी सुरक्षा कर्मचाऱ्याच्या प्रमाणिकपणामुळे भक्ताला मिळाली पुन्हा परत

भक्तनिवासात विसरलेली साईभक्ताची सोन्याची बांगडी सुरक्षा कर्मचाऱ्याच्या प्रमाणिकपणामुळे भक्ताला मिळाली पुन्हा परत
S9 NEWS / शिर्डी

दिनांक 06/04/2024 रोजी गुंटूर, आंध्रप्रदेश येथील साईभक्त के. राजेंद्र श्रीनिवास हे साईबाबा दर्शनाकरिता आलेले होते. ते एक हजार रूम भक्तनिवास येथे कुटुंबासह राहणेस होते. सकाळी ते 08:30 वाजता शनी शिंगणापूर येथे दर्शनाला गेले असता त्यांचे लक्षात आले कि, हातात घालायची सुमारे 20 ग्राम वजनाची सोन्याची बांगडी (एक लाख चौतीस हजार रुपये किमतीची) भक्तनिवास येथे रूम किंवा बाहेर कुठेतरी विसरले आहेत. त्यांनी फोन करून सुरक्षा अधिकारी यांना कळविले असता साईबाबा संस्थान चे सुरक्षा रक्षक प्रवीण भागवत हे तात्काळ त्यांचे रूम मध्ये गेले त्यावेळी तेथे साफ सफाईची काम चालू होते. तेथील सर्व कर्मचारी बोलावून घेऊन त्यांनी ती सोन्याची बांगडी शोधून ऑफिस येऊन जमा केली.

शनी शिंगणापूर वरून साईभक्त आल्यानंतर त्यांची ओळख पटवून सुमारे 1,34,000/- रु किमतीची बांगडी साईभक्ताला परत दिली. त्यावेळी भक्त अतिशय भावुक  झाले आणि शिर्डीत साईबाबांची लीला पाहून साईबाबांवरील श्रद्धा अधिक दृढ झाली.

सुरक्षा रक्षक प्रवीण भागवत यांच्या या चांगल्या कामाबद्दल श्री साईबाबा संस्थान चे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवले यांनी शाबासकी दिली. सदर प्रामाणिक कर्मचारी प्रवीण भागवत यांना संरक्षण ऑफिस ला बोलावून घेऊन त्यांचा संरक्षण अधिकारी रोहिदास माळी यांनी यथोचित सन्मान केला.

रोहिदास माळी यांनी पदभार स्वीकारल्यापासून सुरक्षा विभागातील कामात सुसूत्रता व तप्तरता आल्याने वरिष्ठ तथा ग्रामास्थ ही समाधान व्यक्त करीत आहेत.