पारनेरचे माजी आमदार विजय औटींच्या खा.विखेंना पाठिंब्याच्या निर्णयाने शिवसेनेची दोन शकले...!! औटी निलंबित...!!

पारनेरचे माजी आमदार विजय औटींच्या खा.विखेंना पाठिंब्याच्या निर्णयाने शिवसेनेची दोन शकले...!! औटी निलंबित...!!

S9 NEWS / निलम सुरेश खोसे / पारनेर


 विधानसभेचे माजी उपाध्यक्ष व पारनेर चे माजी आमदार विजय राव औटी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी युतीचे उमेदवार खा . सुजय विखे यांना पाठिंबा जाहीर करून शिवसैनिकांना मतदान करण्याचे आदेश दिल्याने पारनेर तालुक्यातील शिवसेनेची दोन शकले झाली आहेत , तर सायंकाळी जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे सर यांनी माजी आ औटी यांना शिवसेनेतून निलंबित केले आहे .

   सोशल मीडिया वर सुरु असलेल्या चर्चा पाहता , पारनेर तालुक्यातील शिवसेनेतील काही ना हा निर्णय मान्य नसल्याचे चर्चेवरून दिसून येत होते .माजी आमदार विजयराव औटी यांनी लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडी चे उमेदवार माजी आमदार निलेश लंके यांना पाठिंबा देणे , अपेक्षित असताना व तसे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्पष्ट आदेश असताना ही औटी यांनी पक्षाशी विसंगत भुमिका घेतल्याने शिवसेनेतील कडव्या शिवसैनिकांनी सोशल मीडिया च्या माध्यमातून माजी आमदार औटींना लक्ष केले जात आहे . त्यांनी भविष्यातील राजकीय गोष्टींचा विचार करून खा . विखेंना पाठिंबा दिला आहे , तसे त्यांनी पारनेर तालुक्यातील शिवसैनिकांना आदेश दिले असून विखेंना पाच वर्षे लोकसभेच्या कामकाजाचा असलेला अनुभव पाहता व त्यांना पुन्हा निवडून दिल्यास मतदार संघाला एक अनुभव संपन्न खासदार लाभणार आहे , मला सलग तीन वेळा १५ वर्षे आमदार म्हणून निवडून दिले , अश्या ज्या शिवसैनिकांनी मला प्रेम दिले . साडे चार वर्षांपूर्वी पराभवानंतर माझ्या शी प्रामाणिक राहिले . अश्या सर्व शिवसैनिकांनी खा . सुजय विखे यांचा प्रचार करून त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून दया . तुमच्या मनात काही शंका वा प्रश्न असतील , तर माझ्याशी कधी ही संपर्क साधू शकता , असे आवाहन माजी आमदार विजयराव औटी यांनी केले आहे .

      औटी यांचा पाठिंबा मिळावा , याकरिता पालकमंत्री ना . राधाकृष्ण विखे हे सातत्याने संपर्कात होते . त्यामुळे औटी यांनी मंगळवार दि ३० ला पारनेर मध्ये निवडक शिवसैनिकांची बैठक घेऊन चर्चा केली व यावेळी झालेल्या बैठकीतील निर्णय माजी आ . औटी , शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रामदास भोसले , पारनेर तालुका प्रमुख डॉ . श्रीकांत पठारे , पारनेर तालुका युवा सेनेचे प्रमुख अनिल राव शेटे , महिला आघाडीच्या प्रमुख प्रियंका खिलारी यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय गुरुवार दि . १ मे रोजी जाहीर करू, असे सांगितले . त्यानुसार त्यांनी काल बुधवार दि . १ मे रोजी रात्री विखें ना पाठिंबा जाहीर केला व शिवसैनिकांना स्पष्ट आदेश दिला . त्यांच्या या आदेशावर सोशल मीडिया व्दारे अनेक मतमतांतरे व्यक्त होत आहे . औटी यांच्या पाठिंब्या मुळे पारनेर तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहे . महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार निलेश लंके हे पारनेर तालुक्यातील असल्याने व त्यांना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा ही मिळत असल्यामुळे विखे परिवाराने पारनेर तालुक्या वर खास मेहेरनजर ठेवून आहेत . त्यामुळे तालुक्यातील बहुतांशी राजकीय नेते त्यांच्या बरोबर दिसत आहे . लंके यांना पारनेर तालुक्यातच अडकावून ठेवण्यासाठी विखे परिवार नवनवीन राजकीय डाव टाकताना दिसून येत आहे .

    दरम्यान औटींच्या निर्णयामुळे दुखावलेले कडवे शिवसैनिक असलेले तालुकाप्रमुख डॉ . श्रीकांत पठारे , युवा सेनेचे तालुका प्रमुख अनिलराव शेटे , शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख किसनराव सुपेकर , महिला सेनेच्या तालुकाप्रमुख प्रियांका खिलारी , विभागप्रमुख बाबाजी तनपुरे , डॉ . शिरोळे व इतर ज्येष्ठ शिवसैनिकांनी जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांच्या नगर येथील हॉटेल यश पॅलेस येथे गुरुवार दि . २ रोजी दुपारी भेट घेत औटींचा पक्षविरोधी निर्णय मान्य नसल्याचा सांगत महाविकास आघाडी बरोबर राहण्याचा निर्णय घेतला व तसे घोषित करत आघाडी चे उमेदवार निलेश लंके यांना पाठिंबा देत त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे जाहीर केले . यामुळे पारनेर तालुक्यात एकसंध असलेली शिवसेनेत उभी फुट पडली आहे . तर सायंकाळी जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी माजी आ . औटी यांना शिवसेनेतून निलंबित केल्याची घोषणा केली आहे . औटी यांच्या बरोबर उपजिल्हा प्रमुख रामदास भोसले व काही नेते आहेत . पारनेर तालुक्याच्या शिवसेनेत माजी आ औटी यांचा शब्द सप्रमाण असे , त्यांच्या शब्दाला धार व वजन होते , त्यांचा कोणताही निर्णय सहसा डावलला जात नसे . पण ज्या खा . विखेंनी त्यांना विधानसभेत जाण्यापासून रोखले, पराभूत केले. त्यांना लोकसभा निवडणूकीत विजयी करण्याचा घेतलेला निर्णय हा बरेचश्या शिवसैनिकांना पटला नाही , तो त्यांच्या अंगलट आला आहे , अखेर त्याची परिणीती शिवसेनेत उभी फुट पडून दोन शकले झाली आहेत . 

    विजय औटी यांनी अचानक पणे असा टोकाचा निर्णय घेण्याचे कारण ही तसेच आहेत , मागील वर्षी संपन्न झालेल्या पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीनंतरच्या पदाधिकारी निवडणूकीत आ . लंके यांच्याकडून झालेली फसवणूक , दुसरे असे की , सेनापती बापट पतसंस्थेची सध्याची असलेली परिस्थिती , हे व इतर कारणे आहेत . बघू यात , आगामी काळात नगर जिल्ह्याच्या व पारनेर तालुक्याच्या राजकारणा त काय काय राजकीय समीकरणे घडतात . एवढे होवून ही खासदार म्हणून जनता पुन्हा सुजय विखेंना दिल्ली पाठवते की , आमदार असलेले व खासदार की साठी राजीनामा दिलेले माजी आमदार निलेश लंके यांना बढती मिळून दिल्ली जाण्याचा योग येतो की काय ? हे पाहण्यासाठी महिनाभर आपणासर्वाना वाट पाहावी लागेल .