पारनेर पोलीसांच्या सतर्कते मुळे निघोजच्या श्री मळगंगा यात्रेत चोऱ्यांना आळा...!!

पारनेर पोलीसांच्या सतर्कते मुळे निघोजच्या श्री मळगंगा यात्रेत चोऱ्यांना आळा...!!



S9 NEWS / निलम सुरेश खोसे / पारनेर

 राज्यात जागृत व नवसाला पावणारी निघोज च्या श्री मळगंगा यात्रेत पारनेर पोलीस निरीक्षक समीर बारवकर व निघोज बिटचे हेड कॉन्स्टेबल गणेशराव डहाळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचाऱ्यां नी कडक व सतर्कतेने बंदोबस्त ठेवल्याने निघोजच्या श्री मळगंगा यात्रेत एक ही चोरी झाली नसल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांचा देवस्थान ट्रस्टच्या वतीने सन्मान करण्यात आला .
      नगर जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा निघोज येथे भरत असल्याने येथे छोट्या व मोठ्या चोऱ्या या ठरलेल्या असतात, या चोऱ्यांचा व चोऱ्या करणाऱ्या चोरांचा बंदोबस्त करणे , हे पोलीसांच्या जिकिरीचे काम असते . ही यात्रा गावात दोन दिवस व कुंडावर एक दिवस भरते , यावेळी राज्यातून कमीत कमी ५ लाखांपेक्षा जास्त भाविक भक्त श्री मळगंगा देवीच्या दर्शनासाठी हजेरी लावतात . या गर्दीचा फायदा करून घेण्यासाठी लहान मुले , महिला व पुरुष बेसावध भाविकांचे पैसे , मोबाईल , पाकिटे , दागिने चोरतात . यात्रेसाठी चोख बंदोबस्त ठेऊन पारनेर त्या अंतर्गत असलेले निघोज पोलिस व त्यांना सहकार्य करणाऱ्या होमगार्ड पथकाने चोख बंदोबस्त ठेवल्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. पारनेरचे पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांनी निघोज येथे थांबत पोलीसांना मार्गदर्शन करीत पोलीसांनी चोरट्यांना पोलिस हिसका दाखवत चोऱ्या करण्या अगोदरच संशयीत २० महिला व ९ पुरुष यांना ताब्यात घेऊन आय पी सी १०२ नुसार प्रतीबंधात्मक कारवाई करत जेलवारीचे दर्शन घडविले आहे. निघोज पोलीस दूरक्षेत्राचे हेडकॉन्स्टेबल गणेशराव डहाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय उत्कृष्ट बंदोबस्त ठेवल्याने यात्रेकरूंना आनंदाने यात्रेचा आनंद घेता आला . 

     गुरुवार दि.२ मे रोजी पोलीस उपअधिक्षक भोसले यांनी निघोज पोलिस दूरक्षेत्रला भेट देऊन पोलिसांच्या कामगिरीचा आढावा घेत निघोजचे हेडकॉन्स्टेबल गणेशराव डहाळे व त्यांच्या सहकाऱ्यांना शाबासकी दिली आहे. पोलीस उपअधिक्षक भोसले यांनी श्री मळगंगा मातेचे दर्शन घेऊन आशिर्वाद घेतला . यावेळी उपअधिक्षक भोसले व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट, यात्रा उत्सव समितीच्या वतीने विश्वस्त विकास शेटे, आपला गणपती समाजसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवि रणसिंग, यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी पोलीस उपअधिक्षक भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली पोलीस निरीक्षक समीर बारवकर, हेड कॉन्स्टेबल गणेशराव डहाळे व कर्मचाऱ्यांनी ३ दिवस यात्रा काळात डोळ्यात तेल घालून खडा पहारा दिल्याने चोरट्यांची डाळ शिजली नाही , चोऱ्या करण्या पुर्वीच २९ चोरटे अलगत पोलीसांच्या जाळ्यात अडकल्याने श्री मळगंगा मातेची यात्रा निर्धोक पणे पार पडल्याने भाविक भक्त व ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडला.