गुढीपाडव्याला साई मंदिरात हरविलेले सोन्याचे कानातले पुन्हा मिळाल्याने साईभक्त महिलेला अत्यानंद...महिला सुरक्षा कर्मचारी स्वाती मुरकुटेंचा प्रामाणिकपणा उघड..!!

गुढीपाडव्याला साई मंदिरात हरविलेले सोन्याचे कानातले पुन्हा मिळाल्याने साईभक्त महिलेला अत्यानंद...महिला सुरक्षा कर्मचारी स्वाती मुरकुटेंचा प्रामाणिकपणा उघड..!!

S9 NEWS / शिर्डी


श्री साईबाबा संस्थान सुरक्षा विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिक पणाची उदाहरणं सातत्याने समोर येत असून माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानंतर प्रामाणिकपणाचा आदर्श वाढीस लागत असल्याचं दिलासादायक चित्र सध्या दिसू लागलंय. आज गुढी पाडवा सनाच्या शुभदिनी एका महिला सुरक्षा कर्मचाऱ्याने सापडलेले महिला साईभक्ताचे सोन्याचे कानातले प्रामाणिकपणे संरक्षण विभागात जमा केल्याची घटना समोर आली आहे.    
मराठी नववर्षाची सुरुवात म्हणून आजच्या दिवशी सोने खरेदी करायची परंपरा आहे. आज सोन्याचे भाव 73000/- रु प्रति तोळा  झालेत. नेहमीप्रमाणे श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी चे महाराष्ट्र सुरक्षा बल चे महिला सुरक्षा रक्षक स्वाती मुरकुटे या सहा नंबर गेट वर ड्युटी वर असताना त्यांना सुमारे तीन ग्राम वजनाचे ( आजच्या बाजार  भावाप्रमाणे 21000/- रु किमतीचे ) कानातील दागिना सापडला. तो दागिना त्यांनी संरक्षण कार्यालयात प्रामाणिक पने जमा केला. दागिना हरविलेचे तक्रार एका मराठी दाम्पत्य कडून मिळाल्यानंतर तो सोन्याचा दागिना ओळख पटवून परत केला.
ज्यांचा दागिना हरविला ते शेतकरी, ज्यांना दागिना सापडला ती शेतकऱयांची मुलगी. गुढी पाडावाच्या दिवशी दर्शनाला मंदिरात आलो आणि दागिना हरविला म्हणून त्या भक्ताला प्रचंड दुःख झाले. परंतु योगायोग एका महिला सुरक्षा कर्मचारी यांना सापडला आणि तो परत दिला गेला.
 त्यावेळी साईभक्त महिलेला अत्यानंद झाला असून गुढी पाडव्याला मला बाबांनी सोने दिले असे उद्गार त्या महिलेने काढले.
महिला  सुरक्षा रक्षक स्वाती मुरकुटे  यांच्या या चांगल्या कामाबद्दल श्री साईबाबा संस्थान चे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवले यांनी सदर महिला कर्मचाऱ्याला शाबासकी दिली असून प्रामाणिक महिला कर्मचारी मुरकुटे यांना संरक्षण ऑफिस ला बोलावून घेऊन त्यांचा संरक्षण विभागाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी यांनी यथोचित सन्मान केला.