स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आहिल्यानगर जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी पक्षाला राम-राम ठोकत केला शिंदे शिवसेनेत प्रवेश

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आहिल्यानगर जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी पक्षाला राम-राम ठोकत केला शिंदे शिवसेनेत प्रवेश


S9 NEWS / गोविंद फुणगे / राहुरी
       स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आहिल्यानगर जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी स्वाभिमानीला राम-राम ठोकत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या हस्ते शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. मंगळवारी राञी ठाणे येथील आनंद आश्रमात हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला आहे. प्रसंगी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मोरे यांची शेतकरी सेना पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी नियुक्ती करून त्यांच्याकडे शेतकरी सेनेची जबाबदारी दिली आहे.
      राहुरी येथील रवींद्र मोरे हे गेल्या काही वर्षांपासून मा.खा.राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम बघत होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरील अनोख्या आंदोलनामुळे ते सर्वत्र चर्चेत होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सातत्याने शासनाविरोधी आवाज उठवणारे मोरे हे आता सत्तेत सहभागी झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आवाज बंद झाल्याची खंत देखील व्यक्त करण्यात येत आहे. मात्र त्यांच्याकडे आता शेतकरी सेनेची जबाबदारी दिल्याने या माध्यमातून आपण शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावू असे देखील यावेळी मोरे यांनी सांगितले आहे.
  प्रवेशावेळी शिवसेना सचिव संजय मोरे, सुभाष जुंदरे, बाळासाहेब जाधव, विजय तोडमल, सतिश पवार, प्रमोद पवार ,आनंद वने, रविकिरण ढुस धनंजय लहारे , सचिन गडगूळे राहुल करपे ,संदिप शिरसाठ निलेश लांबे ,सचिन पवळे रामभाऊ जगताप आदी उपस्थित होते.