S9 NEWS / गोविंद फुणगे / राहुरी
राहुरीच्या डॉ. तनपुरे साखर कारखान्याचे नवनियुक्त चेअरमन व बाजार समिती सभापती अरुण तनपुरे व त्यांचे सुपुत्र तनपुरे कारखान्याचे संचालक हर्ष तनपुरे यांनी काल मंगळवारी रात्री देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून अरुण तनपुरे हे अजित दादा गटात सामील होणार अशी चर्चा सुरू असताना त्यांच्या प्रवेशाला आज अखेर मुहूर्त मिळाला आहे.राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अशोक सावंत , राहुरी शहराध्यक्ष सुनील भट्टड यांच्या यशस्वी शिष्टाईने हा प्रवेश सोहळा पार पडला आहे. सभापती अरुण तनपुरे व युवा नेते यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे , आ.शिवाजीराव गर्जे, आ.काशिनाथ दाते, जिल्हाध्यक्ष अशोक सावंत , राहुरी शहराध्यक्ष सुनील भट्टड, युवक शहराध्यक्ष निलेश शिरसाठ, अनिल सुराणा आदी उपस्थित होते .याबाबत जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, गेल्या अनेक दिवसांपासून प्रवेशाची अखेर आज अजित दादांच्या उपस्थित प्रवेश पार पडल्याने निश्चितच पक्षाची ताकद वाढणार आहे.
राहुरी शहराध्यक्ष सुनील भट्टड यांच्याशी याबाबत संपर्क केला असता ते म्हणाले की, तनपुरे साखर कारखाना अरुण साहेब तनपूरे यांच्या ताब्यात आल्याने सभासदांच्या आशा पल्लवित झाल्या असून आज अजित पवार गटात अरुण तनपूरे व हर्ष तनपुरे यांनी प्रवेश केला असून निश्चित कारखाना सुरू करण्यासाठी अजित पवार मदत करतील व हा कारखाना सुरू होईल. दरम्यान येत्या आठवड्यात अरुण तनपुरे यांना मानणारे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा मोठा प्रवेश सोहळा कार्यक्रम पार पडणार असल्याचे समजते.दरम्यान माजीमंत्री प्राजक्त तनपूरे यांचे चुलते अरुण तनपुरे यांनी अजित दादा गटात प्रवेश केल्याने प्राजक्त तनपुरे आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे. डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाला सभासदांनी एक हाती सत्ता दिली आहे. लवकरच हा कारखाना सुरू व्हावा अशी सभासदांची इच्छा होती. त्यानुसार हा कारखाना आपण सुरू करू अशी आश्वासन देखील अरुण तनपुरे यांनी निवडणुकीवेळी दिले होते. त्यानंतर त्यांनी आता अजित पवार गटात प्रवेश केल्याने राज्य आणि केंद्र सरकारच्या मदतीने हा कारखाना सुरू होईल का? याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.
*प्राजक्त तनपुरे देखील लवकरच अजित पवार गटात?*
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे माजी मंञी प्राजक्त तनपुरे हे देखील आता शरद पवारांचा हात सोडत अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याचे चर्चा गेल्या काही दिवसापासून होत आहे. मात्र वरिष्ठ पातळीवर अध्याप देखील काही चर्चा सुरू असून येत्या आठवड्यामध्ये सकारात्मक चर्चांनी मार्ग निघत लवकरच प्राजक्त तनपुरे हे देखील अजित पवार पक्षात सामील होतील अशी खात्रीशीर माहीती समजली आहे.