ऐन दिवाळीत संजय काळेंकडून शिर्डी देवस्थान मधील विद्युत विभागातील घोटाळा उघड... 47अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ..

ऐन दिवाळीत संजय काळेंकडून शिर्डी देवस्थान मधील विद्युत विभागातील घोटाळा उघड... 47अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ..

S9 NEWS / शिर्डी


 श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी या देवस्थानातील विद्युत विभागात 77 लाख रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय भास्करराव काळे यांच्या पाठपुराव्यातून हा नवा घोटाळा उजेडात आला असून उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार शिर्डी पोलिसांनी अखेर याप्रकरणी फिर्याद दाखल करून घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. 


याबाबत दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीत म्हटलंआहे की,श्री साई बाबा संस्थान शिर्डी येथे विद्युत विभाग येथे संस्थान कर्मचारी म्हणून 'कार्यरत असताना त्यांचे अखत्यारीत व जबाबदारीमध्ये असलेल्या विद्युत साहित्यांची डेड स्टॉक रजिष्टर प्रमाणे नोंदणी न ठेवता विद्युत साहित्याची चोरी केली व डेड स्टॉक रजिष्टरमध्ये बनावट नोंदी केल्या व ज्यावेळी अपहार उघडकीस आला त्यावेळी अतिरिक्त विद्युत साहित्य सदर ठिकाणी जमा केले आहे. याबाबत लेखापरिक्षण केल्यानंतर असे दिसून आले आहे की, वरील सर्व आरोपींनी मिळून 77,13,923/- रुपयांची विज साहित्य चोरी करून त्याचा अपहार केला आहे. त्यात सर्व 47 आरोपींवर स्वतंत्र पणे चोरीच्या साहित्याची रकमेची जबाबदारी फिक्स केलेली असून त्यापैकी 39 आरोपींनी त्यांचेवरील जबाबदारीची रक्कम भरणा केली आहे.उर्वरीत 8 यांनी त्यांचेवरील जबाबदारीची रक्कम भरणा केलेली नाही. अशा प्रकारे सर्व आरोपी क्र.1 ते 47 यांनी कटाने सदर विद्युत साहित्य चोरी व अपराहर केलेला आहे. वगैरे मजकुराची फिर्याद फिर्यादीने मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे क्रिमीनल रिटपिटीशन क्र. 791/2023 अन्वये दाखल केले होते व त्यात मा. उच्च न्यायालयाने दि. 15.10.2025 रोजी त्यांना पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यास आदेशीत केल्याने त्यांनी सदर तक्रार दाखल केली असून या प्रकाराने शिर्डी सह साई संस्थांन वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.


या चोरी प्रकरणातील आरोपींची नावे पुढीलप्रमाणे..


1) कै. खाडगीर बी.डी. (विद्युत पर्यवेक्षक )


2) नामेदेव रामचंद्र जाधव ( विद्युत पर्यवेक्षक )


3) बाळासाहेब केशव सावंत ( विद्युत पर्यवेक्षक )


4) वसंत दामोधर गाडेकर (विद्युत पर्यवेक्षक )


5) साहेबराव पांडुरंग लंके ( प्र.लेखाधिकारी अलप विभाग )


6) अशोक रंभाजी औटी ( प्रशासकीय अधिकारी )


7) रवि सतिष घुले ( कार्यकारी अभियंता)


8) रघुनाथ भागाजी आहेर ( प्र. कार्यकारी अभियंता )


9) संजय मधुकर जोरी ( कार्यकारी अभियंता )


10) विजय गणपतराव रोहमारे ( उप कार्यकारी अभियंता )


11) राजेंद्र सोपान जगताप ( प्र अभियंता )


12) प्रकाश नाना अभंग ( प्र अभियंता )


13) राहूल मदन इंगवले ( मदतनिस विद्युत विभाग )


(14) सुनिल काशीनाथ धरम ( मदतनिस विद्युत विभाग )


15) एन.आर.शेख ( तारतंत्री विद्युत विभाग )


(16) दिपक शिवाजी तुरकणे (कुशल संस्थान कंत्राटी कर्मचारी विद्युत विभाग)


17) राजेंद्र मोहनारव बोठे ( तारतंत्री विद्युत विभाग )


18) साईनाथ ईनामके (आऊटसोर्स कर्मचारी साई धर्मशाळा )


19) महेश मुंढरे ( आऊटसोर्स कर्मचारी साई धर्मशाळा )


20) स्वप्निल जोंधळे ( आऊटसोर्स कर्मचारी साई धर्मशाळा )


21) प्रमोद शंकरराव चिने ( तारतंत्री विद्युत विभाग )


22) किशोर एकनाथ महाले ( तारतंत्री विद्युत विभाग )


23) उमाकांत तुपे ( तारतंत्री विद्युत विभाग)


24) बाळू कृष्णाराव कुलकर्णी ( मदतनिस सेवानिवृत्त विद्युत विभाग)


25) अरुण गणपत जाधव ( तारतंत्री पाणी पुरवठा विभाग )


26) संजय बाळासाहेब बनसोडे ( मदतनिस विद्युत विभाग )


27) सागर रमेश जगताप ( कुशल कंत्राटी कर्मचारी विद्युत विभाग)


28) संजयकुमार एकनाथ हारणे ( मदतनिस विद्युत विभाग )


29) शरद बाबासाहेब मते ( कुशल कंत्राटी कर्मचारी विद्युत विभाग)


30) महेश मोढे ( अकुशल कंत्राटी कर्मचारी ध्वनीक्षेपण व टेलिफोन विभाग )


31) सागर खामकर ( तारतंत्री पाणी पुरवठा विभाग )


32) रामनाथ लक्ष्मण वाकचौरे ( तारतंत्री विद्युत विभाग )


33) सोमनाथ साहेबराव पाचेरे ( तारतंत्री विद्युत विभाग )


34) विक्रम सुरेश देवकर ( कुशल कंत्राटी कर्मचारी विद्युत विभाग)


35) सुभाष नामदेव लांडगे ( तारतंत्री विद्युत विभाग )


36) महेश विठ्ठल गोंदकर ( तारतंत्री विद्युत विभाग ) :


(37) भानुदास दादा बावके ( तारतंत्री सेवानिवृत्त )


38) विलास भागूनाथ जेजूरकर ( तारतंत्री विद्युत विभाग )


39) सागर ठोंबरे ( आऊटसोर्स कर्मचारी साई धर्मशाळा विभाग)


40) गोरक्षनाथ आप्पा काळे ( तारतंत्री विद्युत विभाग )


41) सुनिल पुंडलीक वाघ ( तारतंत्री विद्युत विभाग )


42) विलास रघुनाथ भावसार ( तारतंत्री विद्युत विभाग )


43) अनिल नामदेव वाणी ( तारतंत्री विद्युत विभाग )


44) सर्जेराव मच्छिंद्र गोरे (कुशल कंत्राटी कर्मचारी विद्युत विभाग)


45) पाराजी चांगदेव वाणी ( मदतनिस विद्युत विभाग )


46) साईनाथ परसराम आव्हाळे ( तारतंत्री विद्युत विभाग ).


47) योगेश रामचंद्र रोहम (कुपशल कंत्राटी कर्मचारी विद्युत विभाग)


सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांनीच सदर घोटाळा बाहेर काढला आहे.