S9 NEWS / साई सुराळे / शिर्डी
शिर्डी येथील गोविंद नगर भागातील रहिवाशी ललित संजय घोरपडे नामक युवकाचे वडिल संजय संजय सोन्याबापु घोरपडे हे २० ते २५ वर्षापासुन शिर्डी येथे व्यवसाय करत होते. दिनांक २६/८/२०२३ रोजी पहाटे सकाळी ४.३० त्याची स्कुटी MH १७ AQ३६८१ दुकान उघडण्यासाठी चालले असता त्यानां युनियन बँक चौक येथे रस्ता ओलांडताना भरघाव येणारे वाहन ट्रक क्र. HR ५५ X ९७३५ या वाहनांनी जोराची धडक देऊन अपघात स्थळावरुन ट्रक चालक हा तेथुन आपला ट्रक घेऊन पळुन गेला.शिर्डी पोलिस स्टेशन येथे याप्रकरणी फिर्याद दिली असुन पुढील तपास सुरु करण्यात आला होता.
सदर ट्रक हा परराज्यातला असुन त्या ट्रक पर्यत पोहोचण्यासाठी २ ते ३ महिण्याचा कालावधी लागेन अंस त्यावेळी शिर्डी पोलिस स्टेशन कडुन सांगण्यात आले होते.मात्र आता या घटनेला जवळपास एक वर्ष लोटलं तरीही कुठलीही कारवाई होत नसल्याने मयत वडिलांच्या न्यायासाठी मुलासह आई प्रतीक्षेत आहे.
यासाठी विविध शासकीय कार्यालयांसह लोकप्रतिनिधी व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार करण्यात आले. कायदेशिर फिर्याद केली तरीही अजुनही ट्रक चालक व मालक यांच्यावर कोणतेही कायदेशिर कारवाई न केल्याचे दिसत आहे.
वांरवार पोलिस स्टेशन ला संपर्क केल्यानंतर आम्ही आमच्या पद्धतीने तपास कार्य सुरु आहे त्यामुळे तुम्हाला पोलिस स्टेशन ला चक्कर मारण्याची गरज नसुन आम्ही आमच्या पद्धतीने तपास करु अशी आश्वासने पोलिस स्टेशन ला गेल्यावर पोलिस कर्मचा-याकडुन मिळत आहे. आम्हाला शिर्डी पोलिस स्टेशन कुठल्याही प्रकराचे सहकार्य करत नसुन गेल्या अनेक महिन्यांपासून पोलिस स्टेशन चे चक्कर मारत आहोत तरी शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने यांनी या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष घालून संबंधित ट्रक चालक व मालकाविरोधात कारवाई करण्याची मागणी ललित घोरपडे यांनी केली आहे. शिर्डी पोलिसांनी गाडी क्रमांक HR ५५ X ९७३५ या वाहन चालक व मालक यांच्यावर कारवाई करावी व आम्हाला न्याय देण्यात यावा अशी विनंतीही पोलिस प्रशासनाला करण्यात आली आहे.
मला त्वरित न्याय द्यावा तसेच माझ्या वडिलांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा मी शिर्डी पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा ही देण्यात आला आहे.